बृहदेश्वर मंदिर (तमिळ - पेरुवुदैयार कोविल பெருவுடையார் கோயில்) तथा तंजई पेरिया कोविल हे तंजावर, तमिळनाडू मध्ये कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित भगवान शिवाला समर्पित द्रविड शैलीतील हिंदू मंदिर आहे. मंदिरास राजराजेश्वरम देखील म्हणले जाते. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. विकसित तमिळ वास्तुकलेचे हे अनुकरणीय उदाहरण आहे, मंदिरास दक्षिणेचा मेरू असेही म्हणतात. हे मंदिर चोळ राजा राजराजा पहिला याने इ.स. १००३ ते १०१० या दरम्यान बांधले. या मंदिरासोबतच चोळ वंशाच्या काळातील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे युनेस्कोच्याजागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे ज्याला "चोळ राजांची जिवंत भव्य मंदिरे (ग्रेट लिविंग चोला टेंपल्स)" म्हणून ओळखले जाते.
राजराजा चोळने इ.स. १००३ ते १०१० या दरम्यान हे मंदिर बांधले व त्याला राजराजेश्वरम असे नाव दिले. मंदिरातील नंतरच्या शिलालेखात मंदिराच्या देवतेला पेरिया उदैया नायनार असे संबोधले आहे, जे बृहदेश्वर आणि पेरुवुदैयार कोविल या आधुनिक नावांचे उगमस्थान असल्याचे मानले जाते. बृहदेश्वर हा शब्द बृहत (अर्थ "मोठा, महान, उदात्त, विशाल"आणि ईश्वर या दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे. चोळ घराणे हे महादेवाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली होती. सध्याचे मुख्य मंदिर व गोपुरम हे ११व्या शतकाच्या सुरुवातीचेच आहे, मंदिरामध्ये मागील १००० वर्षांमध्ये अनेकवेळा नूतनीकरण आणि दुरुस्ती देखील झाली व नवीन मंदिरे देखील जोडली गेली. मुस्लिम व हिंदु राज्यकर्त्यांमधील युद्धे व मंदिरावरील छाप्यांमुळे विशेषतः मदुराईचे मुस्लिम सुलतान यांच्यामुळे मंदिराचे नुकसान ही झाले व वेळोवेळी हिंदू राजघराण्यांनी मंदिराची दुरुस्ती देखील केली. मंदिरातील कार्तिकेय (मुरुगन), पार्वती (अम्मान) आणि नंदीची महत्त्वाची तीर्थे १६व्या आणि १७व्या शतकातील नायकांच्या काळातील आहेत. त्याचप्रमाणे दक्षिणामूर्ती मंदिर नंतर बांधण्यात आले. तंजावरच्या मराठा राज्यांनीही मंदिराची डागडुज केलेली व काही नवी बांधकामे देखील केलेली असा शिलालेख मंदिर परिसरात आढळतो. १९८७ साली या मंदिरासोबतच चोळ वंशाच्या काळातील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे युनेस्को जागतिक वारसा यादीत सामाविष्ट करण्यात आली. २०१० साली या मंदिराला १ हजार वर्षे पूर्ण झाली. कोणत्याही पायाशिवाय उभे असलेले हे मंदिर २००४ च्या त्सुनामीमध्येही सुरक्षित राहिले.
या मंदिराचे शिखर (विमान) दक्षिण भारतामध्ये ग्रॅनाइट वापरून बांधलेले मंदिरांमध्ये सर्वात उंच आहे. मंदिरातील १३ फूट उंचीचा शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे आणि मंदिरामध्ये सुंदर शिल्पकला असलेल्या स्तंभांचे भव्य असे प्रांगण आहे. बृहदेश्वर मंदिर त्याच्या उत्कृष्ट शिल्पकलेसाठी आणि ११व्या शतकातील पितळीृ नटराजाच्या मूर्तीसाठी देखील प्रसिद्ध आहे. मंदिराच्या संकुलात नंदी, पार्वती, कार्तिकेय, गणेश, चंडेश्वर, वाराही, तिरुवरूरचे त्यागराजर व इतर देवांचीही मंदिरे आहेत.
११व्या शतकातील या मंदिराची मूळ स्मारके खंदकाभोवती बांधण्यात आली होती. त्यात गोपुरम्, मुख्य मंदिर, त्याचा भव्य बुरुज, शिलालेख, भित्तिचित्रे आणि शिल्पे प्रामुख्याने शैव पंथाशी संबंधित आहेत, परंतु हिंदू धर्मातील वैष्णव आणि शक्ती परंपरांचा देखील समावेश आहे. मंदिराचे इतिहासात नुकसान झाले होते त्यामुळे काही कलाकृती आता गायब आहेत. त्यानंतरच्या काळात मंदिरामध्ये अतिरिक्त मंडप आणि स्मारके जोडली गेली. हे मंदिर सध्या १६व्या शतकानंतर बांधण्यात आलेल्या तटबंदीच्या मध्यभागी उभे आहे.
बृहदेश्वर मंदिर हे चेन्नईच्या नैऋत्येस सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर तंजावर शहरात आहे. तंजावर हे शहर भारतीय रेल्वे, तामिळनाडू बस सेवा आणि राष्ट्रीय महामार्ग ६७, २४, १३४ द्वारे मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. नियमित सेवा असलेला सर्वात जवळचा विमानतळ तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: TRZ), सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर तामिळनाडूमधील सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे.

फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.
ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.
रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.
रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.
...की, मराठी २६ जानेवारी, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर एकूण ८,०२३ चरित्रलेख होते. यांपैकी २,३२६ म्हणजेच २८% लेख स्त्री चरित्रलेख तर उर्वरित पुरुष चरित्रलेख होते? इंग्लिश विकिपीडियावर हे प्रमाण १८% आहे.
मराठी विकिपीडियाचीप्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
"अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.